Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

Header Ad

//

Breaking News:

latest

    August 20, 2021     Leave A Reply   Posted By:  Trial A+   A- शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात पक्ष प्रवेशाची गर्दी , अनेक कार्यकर्त्यांचा भ...

 

शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात पक्ष प्रवेशाची गर्दी , अनेक कार्यकर्त्यांचा भाजपाला रामराम


सरळगांव(मुरबाड)
 :- कोरोनाच्या काळात कार्यकर्त्याशी हीतगुज न करता आल्याने , दोन वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून शिवसेनेत दाखल झाल्यानंतर सरळगांव येथे घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात  जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन सरपंच , सदस्य , सेवा सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेण्यासाठी गर्दी केली होती.हा मेळावा जिल्हा ग्रामीण प्रमुख तथा हातभाग महामंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली , आमदार शांताराम मोरे , जिल्हा परिषद सदस्य रेखा कंटे, प्राजक्ता भावार्थे , संघटक आप्पा घुडे , कांतीलाल कंटे ,  रामभाऊ दळवी , , उर्मिला लाटे  यांच्यासह अनेक पक्ष पदाधिका-यांच्या उपस्थितीत हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

         यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रकाश पाटील यांनी शिवसेनेत पक्ष निष्ठेला महत्व दिले जात असल्याचे उदाहरण आमदार शांताराम मोरे यांचा  दाखला देत दिला.तर ज्यांनी आज शिवसेनेत प्रवेश घेतला आहे त्यांचा योग्य सन्मान केला जाईल हे सांगतानाच शिवसेनेत गद्दारी सहन केली जात नाही.ज्याला पद मिळाले नाही .त्यांनी ही जबाबदारी काम करा असा संदेश प्रकाश पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. तत्पूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी शिवसेना , जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील , पालकमंत्री एकनाथ शिंदे व उध्दव ठाकरे यांच्या कामावर प्रभावित होऊन शिवसेनेत केला असल्याचे सांगितले. व जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून मुरबाड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोन वर्षात भरीव निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे सांगितले. तर आमदार शांताराम मोरे यांनी आपण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या गाडीचा चालक असल्याचे सांगतानाच पत्नी पंचायत समिती सदस्य असतांना पक्षाने इतर सदस्यांना सभापती उपसभापती पदावर बसवले मात्र आम्ही ते पदावर कधीच दावा केला नाही . त्याचे फळ मला आमदारकीच्या रुपाने मिळाले . आणि फक्त हे  शिवसेनेत घडू शकते . फक्त तुमची निष्ठा पक्षावर ठेवा असा सल्ला त्यांनी सर्व उपस्थित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिला.

प्रतिनिधी:-राजेश भांगे (मुरबाड)

No comments